अन्न धान्य सुरक्षा कायदा २0१३ अंतर्गत फेबुवारी चे धान्य ३१ जानेवारी पूर्वी धान्याची उचल करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांना देण्यात आले होते. रास्त भाव दुकानदारानी त्यांना मंज़ूर धान्य नियतनाप्रमाणे १00 टक्के उचल करुन लाभार्थीना वाटप करायचे होते. मात्र तरी जिल्ह्यातील ५८ रास्तभाव दुकानदारांनी अन्न सुरक्षा कायदा २0१३ फेबुवारी २0१४ च्या अन्न धान्याची उचल केली नाही. त्यामुळेच जिल्हा पुरवठा अधिकारी मिराशे यांनी मंगळवारी या नोटीसा बजावल्या. सदर दुकानदारांनी १८ फेबुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता सुनावणीसाठी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे. सुनावणी गैरहजर राहिल्यास आपले काही म्हणणे नाही असे गृहित पुढील कार्यवाही करण्यात येईल. असे या नोटिशीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.