तुळजापूर रिपोर्टर..: /. कष्ट आणि निष्ठा यांच्या
जोरावर नाविण्याचा ध्यास विचारांचे आदानप्रदान होऊन
सामाजिक
न्यास आंदोलनच्या वतीने तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयाच्या
प्रांगणात आयोजित सत्यशोधक अण्णा भाऊ साठे सत्यशोधक संम्मेलनाचे उद््घाटन
शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. मंचावर पालकमंत्री मधुकरराव
चव्हाण, जि.प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, नगराध्यक्षा विद्याताई गंगणे,
माजी आ. सि.ना. आलुरे गुरुजी, नरेंद्र बोरगावकर, स्वागताध्यक्ष विजय
क्षीरसागर, दयानंद साळुंके, संजय सरवदे, सविता क्षीरसागर, गणपत भिसे, कृषी
सभापती पंडित जोकार, आप्पासाहेब पाटील, धिरज पाटील, सभापती सचिन पाटील,
उपसभापती प्रकाश चव्हाण, राजलक्ष्मी गायकवाड आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय
गृहमंत्री शिंदे म्हणाले की, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवन हे
खर्या अर्थाने उपेक्षितांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या विचारांना
कृतीची जोड होती. आज या उपेक्षित समाजातून साहित्याचा हुंकार येतोय, ही
अण्णा भाऊंच्या विचारांची प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.
महापुरुषांच्या विचारांवरच आपण प्रगती केली असली तरी अजून खूप पल्ला
गाठायचा आहे. त्यासाठी धोके पत्करण्याची तयारी ठेवली पाहिजे. र्मयादित
भूमिका सोडल्याशिवाय प्रगती करता येणे शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उपेक्षित समाज पुढे येतोय, ही चांगली
गोष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री
मधुकरराव चव्हाण, डॉ. कोरडे यांचीही भाषणे झाली. प्रारंभी स्वागताध्यक्ष
विजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात दहाव्या संमेलनामागची भूमिका स्पष्ट
केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित संदर्भ
ग्रंथाचे यावेळी प्रकाशन झाले. सूत्रसंचालन वैभव कानडे यांनी केले. तर आभार
केशव सरवदे यांनी मांडले.