अशोक चव्हान दोषीच ..भाजप .

 रिपोर्टर..■ दिल्लीत पत्रकारांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व नेते किरीट सोमैया यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत राज्यपाल शंकरनारायणन् यांनी राहुल गांधींच्या इशार्‍यावरून खटल्याला परवानगी नाकारल्याचे आता स्पष्ट झाल्याने त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन केले.
■ फक्त अशोक चव्हाणच नव्हेत, तर सुशीलकुमार शिंदे व शिवाजीराव पाटील-निलंगेकर या इतर दोन माजी मुख्यमंत्र्यांवरही खटला भरण्याची पक्षाची मागणी कायम आहे. कोर्टाचा नकार : आदर्शप्रकरणी नाव वगळण्याचा अर्ज फेटाळला मुंबई : बहुचर्चित आदर्श सोसायटी इमारत घोटाळ्याशी संबंधित खटल्यातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्यास विशेष न्यायालयाने शनिवारी नकार दिला.
चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी मंजुरी दिली नसली तरी त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाच्या गैरवर्तनाचा आरोप आहे. यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला चालवता येऊ शकतो, असे नमूद करीत विशेष न्यायाधीश एस. जी. दिघे यांनी चव्हाण यांचे या घोटाळ्यातून नाव वगळण्यास नकार दिला. या निकालाची सविस्तर प्रत लगेच उपलब्ध न झाल्याने न्यायालयाने हा नकार देताना काय कारणमीमांसा केली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. सीबीआयने चव्हाण यांच्यासह एकूण १३ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र चव्हाण यांचे नाव आरोपींमधून वगळण्यासाठी सीबीआयने १५ जानेवारीला अर्ज केला होता. खरेतर चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास आम्ही तयार आहोत; मात्र राज्यपाल शंकरनारायणन् यांनी यासाठी परवानगी दिलेली नाही व त्यांच्या निर्णयाला आव्हान देखील देता येत नाही. त्यात चव्हाण यांच्याविरुद्ध आणखी ठोस पुरावे नसल्याने राज्यपालांना त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासही आम्ही सांगू शकत नाही, असा युक्तिवाद सीबीआयने न्यायालयात केला होता. त्यानंतर न्यायाधीश दिघे यांनी सीबीआयचा अर्ज फेटाळण्यात येत आहे, एवढेच तोंडी जाहीर केले.