प्रशासकीय पातळीवर लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकची तयारी सुरु

उस्मानाबाद रिपोर्टर.. :
निवडणूक २0१४ च्या अनुषंगाने पात्र उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे. यामध्ये स्व:ताच्या जिल्ह्यात पदस्थापना नसावी, ३१ मे २0१४ रोजी जे अधिकारी जिल्ह्यात एका पदावर तीन वर्षे पूर्ण करतील किंवा ज्यांनी यापूर्वी जिल्ह्यात मागील चार पैकी तीन वर्षे पूर्ण केले आहेत, अशा अधिकार्‍याची हल्लीच्या कार्यरत जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येणार आहे. महसूल विभागातील तहसीलदार, उपजिल्हाधिकारी , अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अशा अधिकार्‍यांचा यात समावेश असणार आहे.
जिल्ह्यातील तीन वर्षाच्या कालावधीची गणना करताना पदोन्नती अगोदरचा कालावधी त्याच जिल्ह्यातील असल्यास तोसुध्दा मोजण्यात येणार आहे. याबरोबरच निवडणूक आयोगामार्फत ज्या अधिकार्‍यांवर शिस्तभंग कार्यवाही करण्यात आली आहे, त्यांना निवडणुकीशी संबंधित पदावर काम देण्यात येणार नाही. तसेच निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात आलेल्या बदली पदावर रुजू होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी व पाच तहसीलदार अशा सहा अधिकार्‍यांची या निवडणुकीच्या अनुषंगाने बदली होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, शासनाने दिलेल्या सूचनेनुसार त्यांचा कार्यकाळ पूर्णकेलेल्या अधिकार्‍यांची माहिती येत्या दोन दिवसात शासनाकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर संबधित अधिकार्‍यांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाकतील सूत्रांकडून सांगण्यात आले
सुरु झाली असून, लोकसभेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील अधिकार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.या अनुषंगाने शासनाने माहितीही मागवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.