पालकमंत्र्यांच्या अणदूर गावांत ११ तास लोडशेडींग



 तुळजापूर रिपोर्टर.. - पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अणदूर गावांत २४ तासांपैकी ११ तास वीजेचे लोडशेडींग सुरू असून,त्यामुळे नागरिक,व्यापारी आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
अणदूर गावांत वीजेची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे.विद्युत मीटरमध्ये काड्या करून चोरून वीज वापरणे,विद्युत तारांवर आकडे टाकून फुकटची वीज वापरणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.तसेच अनेकांकडे वीजेची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.
वीज गळती आणि आणि वीज बिलाची वसुली यामुळे अणदूर गाव महावितरणच्या ब्लॅक लिस्टमध्ये गेले आहे.त्यामुळे या गावांत दिवसांतून तीन वेळा लोडशेडींग (भारनियमन) सुरू आहे.पहाटे पाच ते सकाळी नऊ, पुन्हा सकाळी ११ ते दुपारी तीन आणि रात्री सात ते १० या दरम्यान लोडशेडींग सुरू आहे.रात्रीच्या वेळी लोडशेडींग सुरू असल्यामुळे विद्याथ्र्यांच्या आभ्यासावर परिणाम सुरू आहे.विद्याथ्र्यांना अभ्यासासाठी रॉकेलच्या चिमणी किंवा मेनबत्तीचा आधार घ्यावा लागत आहे.तसेच वारंवार विज खंडीत होत असल्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.वीजेअभावी अनेक कामे ठप्प होत आहेत.
वीज गळती कमी करण्याचे काम महावितरणचे आहे,मात्र अधिकारी वीज गळती कमी करण्याऐवजी लोडशेडींगवर भर देत असल्यामुळे जे नियमित बाकी भरतात किंवा प्रामाणिक वीज वापरतात,त्यांनाही वेठीस धरले जात आहे.
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण अणदूर गावचे रहिवारी आहेत.त्यांचे अणदूर गावांत घर असून,त्यांचा बहुतांश मुक्काम अणदूरमध्ये असतो.मात्र त्यांना याबाबत खेद ना खंत आहे.