थांबलेल्या टम्पोला फोर व्हीलरची जोरात धडक


उस्मनाबाद..रिपोर्टर..शहरातील पोलीस लाईन समोर रोडच्या कडेला थांबलेल्या मालवाहातुक टम्पोला चार चाकी गाडीने पाठीमाघुन
जोराची धडक दिल्याने चार चाकी गाडीसह टेम्पोचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.ही घटना दि.13 डिंसेबर 2013 रोजी सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली.यामध्ये कसल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.
पोलीस लाईन समोर रोडच्याकडेला थांबलेला मालवाहातूक टेम्पो कृमांक एम.एच तेरा.आर 2149 याला नंबर नसलेल्या मरूती सुजूकी कंपणीच्या चारचाकी गाडाने जोराची धडक मारली सदरची चारचाकी गाडी ही वकील पी.डी.देशमूख यांची असून स्वता चालक ही देशमुखच होते.गाडीचा आपघात झाला तेव्हा देशमुख हे झोपीत होते.त्यांना हाताला हालकासा मार लागल्यामुळे ताबडतोप दवाखाण्यात हालवण्यात आले.सदरच्या आपघाताचा आवाज एवढा मोठा होता की पोलीस लाईन आणी समोरच्या गल्लीतील संगळे लोक रस्त्याव आले होते.त्यानंतर दि.13 व 14 रोजी ही घटनेचा पंचनामा करण्यात आला नसल्याने दोन्ही गाडया जागेवरच होत्या..