सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

बातमी
मुंबई रिपोर्टर.. : सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन माहिमेचा शुभारंभ राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या हस्ते राजभवन येथे साधेपणाने पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारतीय स्थलसेना व हवाईदलाने उत्तराखंड येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी हजारो लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल राज्यपालांनी भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले.  पालक व शिक्षकांनी मुलांना देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाण दिल्यास मुले देशकार्यासाठी उद्युक्त होतील असे सांगून राज्यपालांनी समर्थ भारत घडविण्यासाठी देशासाठी नि:स्पृहपणे काम करणाऱ्या युवकांची पिढी निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी समान्य प्रशासन विभागाचे सचिव श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रभागाचे प्रमुख अधिकारी ले.ज.पी.आर. शंकर, रिअर ॲडमीरल
जी. अशोक कुमार, कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, मुंबईचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक, उपनगर जिल्हाधिकारी संजय देशमुख, माजी सैनिक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी ध्वज दिनानिमित्त विविध सस्थांनी राज्यपालांकडे धनादेश सुपूर्द केले.