![]() |
||
![]()
चित्रफीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
|
||
नागपूर रिपोर्टर..:
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 9 डिसेंबर पासून सुरू होत
आहे. या अधिवेशनामध्ये एकूण 15 विधेयके सादर करण्यात येणार असल्याची
माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, रोहयो व जलसंधारण मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्य्लव्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण, संसदीय कार्य राज्यमंत्री राजेंद्र मुळक उपस्थित होते. अधिवेशनाच्या प्रारंभी विधान परिषदेत तीन आणि विधानसभेत एक विधेयक प्रलंबित असून 11 प्रस्तावित विधेयके सादर होणार आहेत. मांडण्यात येणाऱ्या शासकीय विधेयकांची यादी पुढीलप्रमाणे : प्रस्तावित विधेयके (11) 1. नरबळी, जादूटोणा व अन्य अमानवी प्रथांना प्रतिबंध करणारे महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन विधेयक, 2013. (अध्यादेश रुपांतर) 2. दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या बाबतीत विकास योजना तयार करणे, त्या सादर करणे व त्यास मंजुरी देणे याबाबत असलेली विहित कालमर्यादा वाढविण्यासंबंधातील तरतुदी करणारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना (सुधारणा) विधेयक, 2013. (अध्यादेश रुपांतर) 3. कृषि विद्यापीठ सेवाप्रवेश मंडळ स्थापन करणे याबाबत तरतुदी करण्यासाठी महाराष्ट्र कृषि विद्यापीठ (दुसरी सुधारणा) अध्यादेश, 2013. (अध्यादेश रुपांतर) 4. अधिसूचीत क्षेत्रातील महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पांच्या उभारणीकरिता विकास आकाराच्या रकमेत वाढ करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना (दुसरी सुधारणा) विधेयक, 2013 (अध्यादेश प्रस्तावित) 5. सन 2013-14 करिता पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यासाठी महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2013. 6. सन 2006-07 व 2007-08 या वर्षांकरिता अधिक खर्चास मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र विनियोजन (अधिक खर्च )विधेयक, 2013. 7. झालर क्षेत्रातील विवक्षित अनधिकृत बांधकाम नियमित करणे तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याकरिता तरतुदी करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, 2013. 8. पेसा अधिनियमाच्या अनुषंगाने अनुसूचीत क्षेत्रातील ग्रामसभा व पंचायती यांबाबत विशेष तरतुदी करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, 2013. 9. पेसा अधिनियमाच्या अनुषंगाने अनुसूचित क्षेत्रे समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीत जिल्हा मंडळावर अनुसूचित क्षेत्राला प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करणे महाराष्ट्र जमीन सुधारणा परियोजना (सुधारणा) विधेयक, 2013. 10. वन क्षेत्रातील संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत, वन जमिनीबाबत अतिक्रमणे तातडीने काढून टाकता यावीत याकरिता निष्कासनाची कार्यवाही तातडीने करणे, वनासंबंधातील गुन्ह्यांबाबत शिक्षेत वाढ करणे इ. तरतुदी भारतीय वने (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2013. 11. राज्यातील साखर कारखान्यांमध्ये वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऊसाची खरेदी व पुरवठा यांचे विनियमन करण्याची तरतुद असलेले महाराष्ट्र ऊस (खरेदी व पुरवठा यांचे विनियमन) विधेयक २०१३. विधानपरिषदेत प्रलंबित विधेयके (1) 1. मुंबई शहर प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण, हैदराबाद सक्तीचे प्राथमिक शिक्षण व मध्य प्रदेश प्राथमिक शिक्षण (निरसन) विधेयक, 2013 (अध्यादेश रुपांतर) केन्द्रीय शिक्षणाचा अधिकार अधिनियम, RTE अनुषंगाने विसंगत तरतुदी असलेले राज्य अधिनियम निरसित करणे. विधानसभेत प्रलंबित विधेयके (3) 1. राष्ट्रीय विधि विद्यापीठ याच्या धर्तीवर राज्यात विधि विद्यापीठे स्थापन करण्यासंबंधी तरतुदी करणारे सन 2013 चे विधान सभा विधेयक. 2. अनुसुचीत क्षेत्रांतील पंचायतींना अधिनियमाच्या अंमलबजावणीचे अधिकार देणारे मुंबईचा शेतांवरील कीड व रोग याबाबत (सुधारणा) विधेयक, 2010. 3. महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अध्यादेश, 2013 (नरबळी, जादूटोणा व अन्य अमानवी प्रथांना प्रतिबंध). |