![]() |
||
मुंबई रिपोर्टर... :
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय
क्रिकेट संघाने त्याला संस्मरणीय निरोप दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. सचिन तेंडूलकरच्या २४
वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीने तमाम भारतीयांना आणि समस्त क्रीडाप्रेमींना
दिलेला आनंद केवळ अवर्णनीय असून त्याची परतफेड करणे शक्य नाही, अशा शब्दात
उपमुख्यमंत्र्यांनी सचिनच्या कारकीर्दीचा गौरव केला.
सचिन तेंडूलकर हे भारतीय क्रिकेटला पडलेले गोड स्वप्न होते. या स्वप्नाने आपल्या सगळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. सचिनची मैदानावरची क्रिकेट कारकीर्द आता संपली असली तरी त्याने दिलेला आनंद चिरंतन टिकणारा आहे. भारतीय क्रिकेट, भारतीय क्रीडा क्षेत्र, भारतीय उद्योग आणि आर्थिक जगताला ऊर्जितावस्था देण्यातही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सचिनची महत्वाची भूमिका राहिली आहे. खेळाडू म्हणून सचिन महान आहेच, परंतु माणूस म्हणून कितीतरी पटीने अधिक महान आहे. मैदानाबाहेरही तो क्रिकेटशी नाते जोडून राहील, क्रिकेटमधील निवृत्तीनंतर तो ज्या क्षेत्रात जाईल तेथे आदर्श निर्माण करेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सचिनबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. |