शेअर-ए-टॅक्सीमध्ये 5 व 6 प्रवासी क्षमतेच्या वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन     मुंबई, दि. 23: मुंबई महानगर क्षेत्रात प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी शेअर-ए-टॅक्सीमध्ये 5 व 6 प्रवासी आसन क्षमता असणाऱ्या वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.  यामुळे प्रवासी भाड्यात 10 कि.मी. अंतरासाठी पुढीलप्रमाणे कपात होणार आहे.
    ऑटोरिक्षाच्या 10 कि.मी. प्रवासासाठी प्रति प्रवासी देय भाडे रु. 44/- इतके आकारण्यात येईल. टॅक्सीमध्ये 4+1 आसन क्षमतेसाठी प्रति प्रवासी रुपये 41/-  तर 5+1 व 6+1 आसन क्षमता असणाऱ्या टॅक्सीसाठी 10 कि.मी.ला प्रति प्रवासी रु. 33/- इतके भाडे देय असेल.
    प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई(मध्य) या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील एकूण 71 शेअर-ए-टॅक्सी स्टॅंडपैकी इच्छित स्टॅंड वरुन 5 व 6 आसन क्षमता असणाऱ्या शेअर टॅक्सीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जास्त आसन क्षमता असणाऱ्या टॅक्सींचा वापर केल्यामुळे प्रवास भाड्यात बचत होणार असून याचा फायदा टॅक्सी चालकांना होणार आहे. यामुळे इंधनात बचत व वायू प्रदुषण कमी होऊन पर्यावरण संतुलन राखण्यास तसेच वाहतूक कोडींसारखी समस्या सोडविण्यास मदत होणार आहे.