ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गटविकास अधिकारी आचारसंहिता
प्रमुख
उस्मानाबाद,
दि. 24- माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2013 मध्ये मुदती संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व
नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व
पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेला आहे. त्यानुसार संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या
निवडणुकीसंदर्भात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यासाठी संबंधित
तालुक्यांच्या पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी हे आचारसंहिता प्रमुख असणार
आहेत. जिल्हाधिकारी डा. के.एम. नागरगोजे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार तुळजापूर, उमरगा, कळंब आणि परंडा येथील गटविकास अधिकारी हे त्या-त्या
तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता प्रमुख राहतील. ****
वृत्त क्र.988 सहाव्या आर्थिक गणनेस 1
आक्टोबरपासून सुरुवात
उस्मानाबाद,
दि. 24- जिल्ह्यातील भौगोलिक सीमांतर्गत असलेल्या सर्व आस्थापनांची संपूर्ण मोजणी
करण्यासाठी येत्या 1 आक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत सहावी आर्थिक गणना सुरु
होत आहे. यासाठी आस्थापनांची माहिती घेण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना सर्व
नागरिकांनी सहकार्य करावे व आवश्यक ती सर्व माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
तथा सहगणना आयुक्त डा. के. एम. नागरगोजे यांनी केले आहे.
केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी
सहावी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे.
यासंदर्भातील नियोजनासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी
संजय गायकवाड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. काळे, सहायक नियोजन अधिकारी श्री.
आगावणे यांच्यासह आठही तालुक्यांचे तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यावेळी
उपस्थित होते.
या गणनेमध्ये सर्व उद्योग,
व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी जावून कुटूंबांना भेट देऊन करण्यात
येणार आहे. या गणनेच्या कामासाठी विविध स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात
आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आर्थिक गणनेच्या माहितीचा वापर हा नियो