सर्वेच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवा...राहूल गांधी

 रिपोर्टार.काँग्रेसचे नेते अजय माकन यांची दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद होती. त्यात राहुल गांधी अचानक आले आणि त्यांनी सरकारवर बॉम्बगोळा टाकला..सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला सारत गुन्हेगार लोकप्रतिनिधींना ‘नेतेगिरी’ची संधी देणारा सरकारचा वटहुकूम काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी टराटरा फाडला. हा वटहुकूम ‘नॉन्सेन्स’ आहे आणि त्याला फाडून फेकून दिलं पाहिजे अशा अतिशय कडक शब्दांत राहुल गांधींनी सरकारवर तोफ डागली.  सरकारनं मुळात वटहुकूम आणणंच चुकीचं आहे असंही राहुल म्हणाले.

या वटहुकूमाला भाजपनेही विरोध केलाय. तीन दिवसांपुर्वी कोर्टाने दोषी ठरवलेल्या खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्याची परवानगी देणारा वटहुकूम केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला. लोकप्रतिनिधीवर ट्रायल कोर्टात गुन्हा सिद्ध झाला आणि कोर्टाने त्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असेल तर त्याचं पद तात्काळ काढून घेतलं पाहिजे, असा निकाल सुप्रीम कोर्टाने जुलैमध्ये सुनावला होता.

पण, सरकारनं सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाजूला सारत वटहुकूम काढून निर्णय रोखण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आता खुद्द काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी वटहुकूमाला विरोध दर्शवलाय. त्यामुळे आता वटहुकूम मागे घेतला जातो का अशी शक्यता आता व्यक्त झाली.