बिडमध्ये विवाहीतेवर सामोहीक बलात्कार

बीड रिपोर्टर ....   जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातल्या केसापुरीत एका विवाहितेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीये. ही महिला माहेरुन सासरी जात होती. पण वडवणी शहरात तिची चुकामुक झाली.

यावेळी ती एकटीचं निघाली असता सुखरुप घरी सोडतो असं सांगत जालिंधर तागडे यानं तीला शेतात नेऊन बलात्कार केल्याचा या महिलेचा आरोप आहे. दुसर्‍या दिवशी या नराधमानं तिला शेतातल्या 2 गड्यांच्या हवाली केलं आणि तो फरार झाला.

पण या प्रकरणानंतरही पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला नकार दिला. स्थानिक नागरिक आणि पत्रकारांच्या मदतीनं शेवटी गुन्हा दाखल करण्यात आला. हे तिन्ही आरोपी अजून फरार आहेत.